गॅस सिलेंडर च्या दरात 254 रुपयाची घसरण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गॅस सिलेंडर च्या दरात 254 रुपयाची घसरण

Share This
-गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली , नोव्हेंबर 2018 मधे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळतोय.
  खबरकट्टा / विशेष :

2018 या वर्षाच्या प्रारंभापासूनच महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढत होता. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते.

••जानेवारी  2018 मध्ये 14 किलोचे गॅस सिलिंडर 762 रुपयांना मिळत होते.
•• त्यानंतर जुलैमध्ये याच गॅस सिलिंडरची किंमत 776 झाली. 
••त्यानंतर सप्टेंबरमध्ये 837, ऑक्टोबर महिन्यात 896 रुपये आणि नोव्हेंबर महिन्यात 958 रुपये गॅस सिलिंडरची किंमत झाली.

पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किंमतीमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली होती. डिसेंबर महिन्यात या पाचही राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये देशातील सत्ताधारी भाजपचा पराभव झाला. परिणामी इंधन दरकपातीला सुरवात झाली. मात्र, त्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ पुन्हा सुरु झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. 

••डिसेंबर २०१८ मध्ये १४.२ किलोचे गँस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले. या महिन्यात हे ८२३ रुपयाला मिळाले. 

••आता जानेवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत १३२ कपात होऊन आता हे सिलिंडर ७०४ रुपयांना मिळत आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी या अडीच महिन्यात तब्बल २५४ रुपयांनी सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीमुळे का होईना; सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने गॅस सिलिंडरच्या किमती कमीच राहण्याची शक्यता आहे. 