22 जाने 2019 एस एम मुश्रीफ यांचे चंद्रपूर येथे जाहीर व्याख्यान .सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

22 जाने 2019 एस एम मुश्रीफ यांचे चंद्रपूर येथे जाहीर व्याख्यान .सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे आयोजन

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : महापुरूषांच्या विचाराने प्रेरीत होऊन सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या वतीने, वर्तमान काळात देशाला भेडसावत असलेल्या आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यलस्था व भारतीय संविधाना समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. देशात धर्माच्या नावावर धर्मांधांनी ऊभे केलेल्या  महत्वपूर्ण विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यान कार्यक्रमाचे ऊद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे माजी ऊपसभापती मा अडव्होकेट मोरेश्वरजी टेंभूर्डे करणार आहेत.

दि 22/01/19 ला सायंकाळी 5 वा प्रियदर्शिनी सभागृह चंद्रपूर येथे आयोजीत व्याख्यानाला महाराष्ट्राचे माजी पोलीस आयजी अर्थात महानिरीक्षक व जगभर गाजलेल्या "हु किल्ड करकरे"या पुस्तकाचे लेखक मा एस एम मुश्रीफ व सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे हे "धर्मांधांचा संघटीत दहशतवाद : भारतीय लोकशाही व संविधाना समोरचे मोठे आव्हान".या विषयावर आयोजित व्याख्यानात विचार मांडणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे जेष्ठ संघटक मा भास्करराव मुन राहतील.


सदर कार्यक्रमाला विषेश निमंत्रीत म्हणून मा डॉ रजनीताई हजारे बल्लारशाह, राजेंद्र वैद्य, राजूभाऊ झोडे, अडव्होकेट दत्ताभाऊ हजारे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्रा रमेशचंद्र दहीवडे, मा नामदेवराव कन्नाके, मा अनवरभाई अली, सुधाकरराव कुंदोजवार, अडव्होकेट फरहाद बेग, प्रा विजयराव बदखल, मा हिराचंद बोरकुटे, मा पप्पू देशमुख, मा खुशाल तेलंग, मा सतीश मालेकर, मा बलराजसिंग वधावण, रूद्राजी कुचणकर वणी,  डॉ मनोहरराव लेनगुरे, मा. पांडुरंग गावतुरे, मा भिवराज सोनी, मा. दिनेशजी एकवणकर, मा जगणजी पचारे, मा बंडूभाऊ हजारे, मा माणिकराव सावरकर, मा पुंडलीक नंदुरकर, मा सेवकचंद नागदेवते ई मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, वकील, डॉक्टर, व्यापारी, महीला भगिनी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा* असे आवाहन प्रा माधव गुरनुले, राजकुमार जवादे, इंजी ल वि घागी, पी एम जाधव, इंजी सुर्यभान झाडे, डॉ बाळकृष्ण भगत, सुधाकर अडबाले, डॉ देवराव पिंपळशेंडे, रविंद्र चिलबुले, दिलीप होरे, जयभारत नवाडे, योगेश आपटे, साधूजी मुसळे, नवनाथ देरकर, विजय शिंदे, अशोक मेश्राम, अडव्होकेट राजेश वनकर, सुभाष शेंद्रे, सी एम अंबादे, सुनील पोराटे, शैलेश लोखंडे, विनोद सोनटक्के, जयपाल वांढरे, कामेश कुरेकार, भास्कर सपाट, राकेश कालेशवार, सतीश निमसरकर, सुरेंद्र अडबाले, किशोर ताजने, सुधाकर कोरडे, गजानन इंगलवार व संदीप राहणे ई. केले आहे.